सामान्य - बहुजनांच्या शारीरिक , नैतिक आणि बौध्दिक विकासासह व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी , त्यांच्यात जागतिक आव्हाने पेलण्याची क्षमता निर्माण करणे तसेच जिवनाचा खराखुरा इत्यार्थ समजण्यासाठी त्यांना सर्वार्थाने समर्थ बनविणे हेच आमचे ध्येय असुन त्यादृष्टीने आवश्यक गुणवत्तापुर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्याचा आमचा सतत ध्यास आहे .
अशी आहे आमची परंपरा
*आम्ही लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे विद्यार्थी - विद्यार्थीनी गणवेष परिधान करुनच महाविद्यालयात प्रवेश करतो .
* ओळखपत्र ( आयकार्ड ) नियमित आमच्या सोबत असते .
* शिस्त आणि अनुशासन हीच आमची परंपरा आहे .
* तासिका चालु असतांना आम्ही व्हारांड्यात फिरत नाहीत .
* परसिरातील वृक्षांची व फुलझाडांची आम्ही निगा राखतो .
* छेडछाड , टिंगल- टवाळी या गोष्टीपासून आम्ही दूर आहोत .
* नियमित तासिका करण्याची आमची दृढ़ मानसिकता आहे .
* आम्हाला कुठलेच वाईट व्यसन नाही .
* कार्यालयीन कामकाज व ग्रंथालय देवघेव यासाठी आम्ही ठरवुन दिलेल्या काऊंटरचाचंशांततेत व शिस्तीत वापर करतो .
* आमचा परिसर आम्ही स्वत : स्वच्छ ठेवतो .
* म्हणूनच , आमच्या महाविद्यालयाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ... !